Saturday, September 20, 2008

"कोकाण..! (कोकण)"... "Rock On" गाण्याच्या चालीवर :P

Actually हीला कविता म्हणता येणार नाही.. "Rock On" या आवडलेल्या चित्रपटातल्या गाण्याच्या चालीला धरुन हे एक नविन टाईमपास गीत बनविले आहे.. Just like "कधी कधी आधी ती" सारखे.. :) बॅकग्राउंडला original गाण्याची चाल धरुन हे मालवणी शब्द तोलुनमापुन म्हटले तर सॉलिड वाटते.. Afterall कोकण रॉक्स !!

ह्रदय काय म्हणे तुमका.. काय म्या सांगुss
तुमका वाटात म्या खुळो झालय..
काळीज सांगे म्या जगभSSर जायाSSन..
ओरडान ओरडान दुनियेक बोल..

कोकण..! आसय मोठा समुद्रकिनारा..
कोकण..! दिसता नदी-डोंगरदर्‍याss..
कोकाण..! तुम्ही फक्त बघित रवात,
कोकण..! शोभता महाराष्ट्राचा हिराsss

पावसात दिसे भातशेतीचा पसारा..
उकाड्यात खाउचा काजी-फणस्-आंबा..
देवळीत ऐकुचा उत्साही गार्‍हाणा..
मगे तुम्ही पण बोला "होय म्हाराजाsss"

कोकण..! छान दिसतत कौलाची घरा..
कोकण्..! गंध मिळात तांबड्या मातीचा..
कोकण..! चाखुचा मालवणी जेवण..
कोकाण..! दिसात मालवण किल्ल्याचा दराराssss..

सांगे काळीज, ह्या हिर्‍याच्या..कुशीत.. पडुन रव..
माका फक्त, एकच सांगुचा की..
एकदातरी.. ट्रेन्,बस.. पकडान.. कोकण गाठ तूsss..!

कोकण..! छान दिसतत कौलाची घरा..
कोकण्..! गंध मिळात तांबड्या मातीचा..
कोकण..! चाखुचा मालवणी जेवण..
कोकाण..! दिसात मालवण किल्ल्याचा दराराssss..

कोकण..! आसय मोठा समुद्रकिनारा..
कोकण..! दिसता नदी-डोंगरदर्‍याss..
कोकाण..! तुम्ही फक्त बघित रवात,
कोकण..! शोभता महाराष्ट्राचा हिराsss