Friday, August 8, 2008

"Kabhi Kabhi Aaditi" गाण्याची चिरफाड :D

"कभी कभी आदिती" गाण्याची मी केलेली चिरफाड.. हीला मस्का मारुन मनवण्याऐवजी"ती"च्या बद्दल हिच्यासमोर गायचे हे गाणे.. :P

कधी कधी आधी ती.. जीवनात माझ्या आपलिशी वाटते..
कधी कधी आधी ती.. स्वप्नात माझ्या समोर उभी राहते..
अशावेळी तुला.. माझ्यासंगे कसे मी सोसावे..
अन कसे म्हणावे.. सगळे होईल की ओके

कधी कधी वाटते ती असती तर.. किती झाली असती मजा..
कधी कधी वाटते तिच्यासारखी.. नाही कुणाची अदा..
अशावेळी तिला.. विसरोनी कसे मी जगावे..
अन कसे मी म्हणावे.. सगळे होईल की ओके !

मरतात बघ तिच्यावर आमच्यासारखे सगळे..1
मी ही फिदा झालो जेव्हा तिला पाहिले.
सांगता.. येत.. नव्हते पण तिला सांगुन पाहिलेs..
आधी ती, हो म्हणाली असती तर छान झाले असते..
पण नाही का.. कमनशिबी लोकांचे जीवन अंधारमय राहते.. :(

कधी कधी आधी ती, जीवनात माझ्या आपलिशी वाटते..
कधी कधी आधी ती.. स्वप्नात माझ्या समोर उभी राहते..
आधी ती.. कसं कसं कसं बरं खुणावते ती मला..
मग थोडी थोडी थोडी थोडीशी आठवते तु मला... :(

तू असतेस तेव्हा बघ जग कस भकासं वाटतं..
पण तिच्या स्वप्नात राहुन कसं झकास वाटतं..
ऐक ना जराsss... माझे वेडेपण तुला काय सांगते...
की आधी ती.. दुर असली तरी माझ्या मनात असते..
आधी ती.. तुला उमजे वा ना कळे.. मला फार फार आवडते..!

कधी कधी आधी ती.. जीवनात माझ्या आपलिशी वाटते..
कधी कधी आधी ती.. स्वप्नात माझ्या समोर उभी राहते..
अशावेळी तुला.. माझ्यासंगे कसे मी सोसावे..
अन कसे म्हणावे.. सगळे होईल की ओके !!

आधी ती.. कसं कसं कसं बरं खुणावते ती मला..
मग थोडी थोडी थोडी थोडीशी आठवते तु मला...
:(

No comments: