Saturday, August 8, 2009

आठवणीतल्या काही माझ्याच ओबडधोबड कविता !

तुझी हास्यमुद्रा
हेच माझे जगणे..
अश्रु तुझ्या डोळ्यातील
कधी न मला बघवणे !
~~~~~~~~~~~~~~~~~~

नको कोंडुस त्या आसवांना,
वाट करुनी दे संदीग्ध भावनांना..
विश्वास ठेव मनावरी जगताना,
तेजोकिरणाची साथ लाभेल आयुष्यात
ज्याची प्रखरता अंधुक करील त्या सावल्यांना..

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

तुझ्या संगतिचा गारवा
विझवेल मनातीलही वणवा..
सावरेलही खळवळलेल्या समुद्रात,
माझ्या जीवनाची नाकवा..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

तु समोर असतेस, तेव्हा जवळच असतेस
तु दुर असलीस तरी मनातच राहतेस..
अशी सदैव कशाला पळतेस
मनात माझ्या...
की विचारांनी मलाच दमवतेस !!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

तुझीच स्वप्ने पाहुनी,
दिवसही जातोय झोपुनी !
मनही थकलेय तुला शोधुनी,
संपव ही भटकंती,सामोरे तु येउनी..!

No comments: