Wednesday, August 5, 2009

प्रेमात पडायचे म्हणजे..?? (IInd Thought :P )

प्रेमात पडायचे म्हणजे..
स्वत्:ला बांधुन घ्यायचे..
एकमेकांच्या आठवणींनी तळमळायचे..
एकमेकांचे रुसवेफुगवे पहायचे..
एकमेकांना मनवायचे..
वेळात वेळ काढुन भेटायचे.
दिवसरात्र फोनवर तेच तेच बोलायचे..
इतरांना दाखवायचे, घरतल्यांपासुन लपवायचे..
प्रसंगी खोटे बोलायचे..
मित्रांना विसरायचे..
अरे काय काय म्हणुन करायचे..
कशाला म्हणुन सोसायचे..
त्यापेक्षा प्रेमापासुन दुरच रहायचे..
टेन्शन्फ्री लाइफ मस्तपैकी जगायचे.. !!

No comments: